पुणे, 25 जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडी **(ED)**च्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी धाड टाकलीय. त्यासोबतच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला या चौकशीची चिंता नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी म्हटलं, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठी होत आहे. या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत, या गोष्टीची आम्हाला कसलीही चिंता नाही. देशमुखांच्या चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न तयार झाला आहे. अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावर म्हटलं… अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव काल ज्या पक्षाने मांडला. त्या पक्षातर्फे ज्यांनी मांडला ते बुद्धिमान गृहस्थ आहेत असं म्हणून शरद पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक ईडीच्या ताब्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.