रित्विज सोनी, अहमदाबाद 23 मे: गुजरातमध्ये झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अहमदाबाद हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. इथल्या सगळ्यात मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहे. मात्र कोरोनाला रोखण्यात यश अजून मिळालेलं नाही. सगळे कोरोनाविरुद्ध लढत असताना सिव्हिल हॉस्पिटलमधून धक्कादायक गोष्ट बाहेर आली आहे. कोरोनाबाधित पीडितांच्या मृतदेहांवरचे दागिने चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह गायब होणं, मतदेहांशी छेडछाड होणं अशा घटना घडत असल्याने वादळ निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी बारीक नजर ठेवली असताना त्यांना धक्कादायक गोष्टी आढळून आली. हॉस्पिटलच्याच स्वच्छता कामासाठी नेमलेले दोन जण हे कोरोनाग्रस्तांचे मृतदेह बॅगमधून काढून त्याच्यावरचे दागिने लंपास करत असल्याचं आढळून आलं आहे. अमित शर्मा आणि राजेश पटेल अशी आरोपींची नावे आहेत. कोणतीही भीती न बाळगता हे लोक शवगृहात जात हे कृत्य करत होते. पोलिसांनी आता त्या दोघांचीही कोरोना चाचणी केली आहे. या घटनेमुळे अतिशय संताप व्यक्त होत असून हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारतातील त्या सायकल गर्लचं इवांका ट्रम्पकडून कौतुक; ओमर अब्दुल्ला मात्र संतापले दरम्यान, Coronavirus च्या लॉकडाऊनच्या काळात दोन महिने बंद असलेली रेल्वे सेवा अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी पुन्हा सुरू झाली. 1 मेपासून या मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फायदा मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घर असलेल्या स्थलांतरित कामगारांनी घेतला आहे. रेल्वे बोर्डातर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून 2600 गाड्या सोडण्यात आल्या आणि त्याचा फायदा घेत 35 लाख लोक आपापल्या घरी पोचू शकले. या 35 लाखातले 80 टक्के कामगार म्हणजे सुमारे 28 लाख लोक देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहोचले आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली. 1 जूनपासून सुरू होणार सुरू होणार एक्स्प्रेस ट्रेन; रेल्वेकडून महत्त्वाची माहिती 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हापासून 2600 फेऱ्या झाल्या आणि 35 लाख कामगार गेले आपापल्या गावी पोहोचले. पुढच्या 10 दिवसांत आणखी 2600 गाड्या सोडण्यात येतील, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं. राज्यानं मागणी केल्यास त्या त्या राज्यासाठीही रेल्वे सोडण्याचा विचार करण्यात येईल, असंही विनोदकुमार यादव यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







