पुणे, 14 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कारण या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव आलं असून हेच मंत्री सदर तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेबाबत आता राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
'पूजा चव्हाण आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या गोष्टीचे राजकारण करू नये.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून जे सत्य आहे ते समोर येईल, मात्र पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावर अन्याय होता कामा नये. या प्रकरणाला एखादी व्यक्ती कितीही मोठी असेल तरीही जर ती या प्रकरणात जबाबदार असेल तरीही त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल,' असं म्हणत या प्रकरणात रोहित पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली.
हेही वाचा -संजय राठोड यांच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा गर्दीअभावी रद्द!
'व्हॅलेंटाईन डे' निमित्त आमदार रोहित पवार यांनी आज मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांसोबत 'व्हॅलेंटाईन डे'
रोहित पवार यांनी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत तेथील शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 'कठीण काळातही शेतकरी अन्नधान्य पिकवतात आणि आपल्या देशाला त्याचा पुरवठा करतात. त्यामुळे फक्त आजचाच दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस आपण शेतकऱ्यांच्या ऋणात राहिला हवं, असं मला वाटतं आणि म्हणूनच मी आज इथे आलो,' असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.