Home /News /pune /

नयना पुजारीच्या दोषींना फाशी की जन्मठेप?

नयना पुजारीच्या दोषींना फाशी की जन्मठेप?

09 मे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नयना पुजारी बलात्कार आणि हत्यप्रकरणी तिन्ही दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांवर बलात्कार, हत्या, अपहरण आणि चोरीचा आरोप सिद्ध झाला आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला दोषमुक्त करण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता निकालाचं वाचन होईल. फास्ट ट्रॅक कोर्टात केस येऊनही तब्बल सात वर्षांनंतर आज खटल्याचा निकाल लागत आहे. सिनिक्रॉन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या नयना पुजारीचं लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 7 ऑक्टोबर 2009 रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर नयनावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. फास्ट ट्रॅक कोर्टात केस येऊनही तब्बल सात वर्षांनंतर आज खटल्याचा निकाल लागत आहे. शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. अटकेनंतर एकदा योगेश राऊत रुग्णालयातून पळून गेला होता. दीड वर्षं दिल्लीत वेशांतर करुन राहणाऱ्या योगेशला शिर्डीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. नयनाच्या मारेकऱ्यांसाठी वकिलांनी फाशीची मागणी केली आहे. तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नयनाचे पती अभिजीत पुजारींसह तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांच्या ढिसाळपणावर ताशेरे ओढत न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
First published:

Tags: Verdict

पुढील बातम्या