S M L

नयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2017 01:16 PM IST

नयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा

08 मे : सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हत्येप्रकरणी तब्बल सात वर्षानंतर आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचे आरोप निश्चित झाले आहेत. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला असून उद्या (मंगळवारी) या तिन्ही आरोपींविरोधात शिक्षा सुनावली जाणार आहे.

सिनिक्रॉन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारी हिचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा निघृण हत्या केली होती. या प्रकरणी योगेश अशोक राऊत, राजेश पांडुरंग चौधरी, महेश बाळासाहेब ठाकूर, विश्वास हिंदुराव कदम या चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

8 ते 9 आॅक्टोबर 2009 रोजी ही घटना घडली होती. गेली 7 वर्षे या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू होती. नयना पुजारी खून खटल्यामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात हा निकाल देण्यात येणार आहे.

या खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू असताना मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर राऊतला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा गजांआड केले. राऊतला पळून गेल्याच्या प्रकरणात कोर्टाने सहा वर्षे शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात आरोपी राजेश चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे त्यावर हायकोर्टात हरकत घेण्यात आली होती. मात्र हाय कोर्टाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 11:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close