मुंबई, 28 मार्च : पुण्यातून मुंबईला एक्सप्रेसवेने जाणाऱ्यांचा खिसा आणखी गरम होणार आहे. 1 एप्रिल 2023पासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल 18% ने वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवासाचा खर्च वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, MSRDC दर वर्षी ईवेवरील टोलमध्ये 6% वाढ करते, परंतु ते दर तीन वर्षांनी एकदा एकत्रितपणे लागू केले जाते. दरम्यान हा हिशोब पाहता टोल वाढवला जाणार असल्याची माहिती आहे. 1 एप्रिलपासून 18% ने ही वाढ असणार आहे.
एप्रिलपासून 94 किमी स्पीड कॉरिडॉरवर वन-वे टोल पूर्वी 270 रुपये द्यावा लागत होता तो आता 320 रुपये द्यावा लागणार आहे. कारसाठी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी टोलमध्ये पूर्वी 270 रुपये होते ते आता 360 रुपये (एक्स्प्रेसवेवर 320 रुपये आणि वाशीजवळ आणखी 40 रुपये) खर्च करावे लागणार आहेत.
पुणे, मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ कायम चर्चेचा विषय ठरतो.
तर ‘हे’ सगळं फडणवीसांनीच घडवून आणलं, तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोटअनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.