मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसब्याचा धसका? 2024 ला चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून लढणार!

कसब्याचा धसका? 2024 ला चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून लढणार!

चंद्रकांत पाटील 2024 ला कोथरूडमधून लढणार नाहीत?

चंद्रकांत पाटील 2024 ला कोथरूडमधून लढणार नाहीत?

कसबा पेठमधल्या पराभवानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील 2024 ची निवडणूक कोथरूडमधून लढणार का नाही? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 27 मार्च : कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला. बालेकिल्ल्यामध्येच पराभव झाल्यामुळे भाजपच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एवढच नाही तर आता 2024 ची निवडणूक चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार का नाही? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांसमोर कोथरूडसोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचाही पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे.

न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्ल्यूझिव्ह मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी 2024 च्या निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. 2019 मध्ये चंदगड विधानसभेचा पर्याय होता. चंदगडमधून निवडून यायची तयारी होती, पण राजकीय गणित आणि रणनीतीनुसार कोथरूडची निवड केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 2019 मध्ये कोल्हापूरच्या चंदगडसह चार विधानसभा आणि मुलूंडचाही पर्याय होता, असंही त्यांनी सांगितलं. 2024 ला पक्षश्रेष्ठी ठरवतील तिथून लढेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'केंद्राच्या होम डिपार्टमेंटचा असा सर्व्हे होता की चार विधानसभेच्या जागा अशा आहेत, जिथे चंद्रकांत पाटलांचा विजय होऊ शकतो. तरीही काही राजकीय समिकरणांसाठी केंद्रीय नेतृत्वाने कोथरूडमध्ये लढण्याचा आग्रह धरला. केंद्राला मला सुरक्षित करावसं वाटलं असतं तर त्यासाठी आणखीही मतदारसंघ होते. मी मुलूंड लढावं अशीही चर्चा होती,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

'2024 ला मी कुठून लढणार, हे माझे श्रेष्ठी ठरवतील. 2019 ला मला कोल्हापूर जिल्ह्यामधून लढायचं होतं. चंदगडचे लोक माझ्यासमोर उभे राहिले होते आणि ही निवडणूक बिनविरोध करू, असं सांगितलं. पण हे सगळं पक्षश्रेष्ठी ठरवतील, असं मी त्यांना सांगितलं,' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: BJP, Chandrakant patil