Home /News /pune /

पुणे जिल्ह्यातही पुराचा धोका? नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यातही पुराचा धोका? नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे, 16 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसह आता पुणे जिल्ह्यातील काही भागातही पुराचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. कारण मुळशी धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 11 ते 12 दरम्यान मुळशी धरणाच्या सांडव्यातून 1 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 'कृपया धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवित वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,' असे आवाहन करण्यात आलं आहे. कृपया याची नोंद घ्यावी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना तात्काळ देण्यात याव्या, असंही धरण प्रशासनाने सांगितलं आहे. हेही वाचा - कोल्हापूर, सांगलीकरांनो, सतर्क राहा! पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा महापुराचे संकट दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये मागील वर्षी महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं. आज वर्ष उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे. कोल्हापूर, सांगलीतील चांदोली आणि साताऱ्याच्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या