जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

दर्शना पवार

दर्शना पवार

दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. १२ जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण तरुणी दर्शना पवारच्या खून प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक करण्यात आली आहे. दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. 12 जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती.  18 जून रोजी राजगडावर दर्शना पवार चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती. तिच्या आई वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.  वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आरएफओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाहीत म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्या बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले होते. Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर, राहुलच्या अटकेनंतर खुलासा   दरम्यान, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पोलीस घेत होते. दर्शनाच्या हत्या त्याने केल्याचा संशय आहे. राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रजमध्ये दिसून आलं होतं. त्यानतंर दोन दिवसांनी दिल्लीत एटीएममधून पैसे काढल्याची माहिती समोर आली होती. तर रविवारी रात्री नातेवाईकांशी फोनवर बोलला होता. कोलकात्यातही त्याचं लोकेशन आढळलं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात