पिंपरी चिंचवड, 29 ऑक्टोबर : काही लोकांच्या चुकीमुळे भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाणारा मण्यार हा एका झाकणात अशा पद्धतीने अडकला की त्या सापाला धड सरपटताही येत नाही आणि खाल्लेल पचतही नाही. हे स्थानिकांच्या लक्षात आलं पण साप विषारी असल्याने त्याला कोणीही मदत केली नाही. अखेर सर्पमित्र कृष्ना पांचाळ आणि त्यांच्या सहका-यांनी या सापाला ताब्यात घेतलं आणि साप चावू नये म्हणून त्याचं तोंड एका लोखंडी नळी मध्ये घालून त्याच्या अंगात अडकलेले हे झाकण मोठ्या काळजीपूर्वक तोडलं. त्याचाच हा व्हिडिओ पाहून अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.