मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला दीड किलोचा सुवर्णहार फसवणुकीच्या पैशातून! CID ने लावला छडा

पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला दीड किलोचा सुवर्णहार फसवणुकीच्या पैशातून! CID ने लावला छडा

रवीवती चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं

रवीवती चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं

देशातील अनेकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवून करोडो रुपयांना लुटणाऱ्या आरोपीनं फसवणुकीच्या पैशातून पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल दीड किलो सोन्याचा हार (Dagdusheth ganpati pune 1.5 Kg Gold necklace) अर्पण केला होता. CID च्या तपासात मोठा खुलासा झाला आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 16 मार्च: आतापर्यंत भारतात अट्टल गुन्हेगारांनी सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या विविध योजना आणून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. समृद्ध जीवन कंपनीनेही (Samruddha Jeevan Scheme Fraud ) देशातील अनेकांना लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांना लुटलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार (Mahesh Motewar) यानी या फसवणुकीच्या पैशातून 2013 साली पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल दीड किलो सोन्याचा हार (dagadusheth halwai ganpati pune 1.5 Kg Gold necklace) अर्पण केला होता. या प्रकरणाचा छडा CID तपासात लागला आहे. हा हार सीआयडीने पुन्हा ताब्यात घेतला आहे. या सोन्याच्या हाराची किंमत जवळपास 60 लाखांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

समृद्ध जीवन घोटाळा भ्रष्टाचाराच्या दुनियेत खूपचं गाजलेलं प्रकरण आहे. या घोटाळ्यात समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजना आणून देशातील सामान्य लोकांपासून ऐशो आरामात जगणाऱ्या बड्या श्रीमंत लोकांनाही अमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Chit fund scheme) केली होती. यामुळे 2014-15 हे वर्ष चांगलचं गाजलं होतं. समृद्ध जीवन कंपनीने देशभरातील लाखो गुंतवणुकदारांना तब्बल 2512 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. यामुळे 2015 साली महेश मोतेवार यांना पोलिसांनी अटक केली होती.

क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला, मुलगी खिडकीतच अडकली!

याच पैशांची उधळपट्टी करताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश मोतेवार यानी 2013 साली पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल दीड किलो वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला होता. सीआयडीच्या तपासात ही बाब उघड झाली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून कारवाई करत  पोलिसांनी हा हार परत मिळवला आहे. हा हार सध्या सीआयडीकडे असून पुढील कार्यवाही केली जात आहे, असं वृत्त लोकमतने दिलं आहे.

हे ही वाचा- समृद्ध चिटफंडची संचालिका लीना मोतेवारला अटक

सीआयडी अधिकारी मनिषा पाटील यांनी सांगितलं की, 'मोतेवार यांनी गंडा घातलेल्या पैशांचा वापर कुठे केला, याची माहिती शोधत असताना आम्हाला या हाराविषयी  माहिती मिळाली. देशभरातील लाखो लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच हा हार घेतल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर आम्ही दगडूशेठ ट्रस्टशी बोलून हा हार परत घेतला आहे.” या हाराचं सध्याचं बाजारमूल्य जवळपास 60 लाख 50 हजार रुपयांच्या घरात आहेत. या हाराबाबतीत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Dagaduseth halwai ganpati temple, Financial fraud, Pune