मुंबई, 04 जानेवारी : राज्यात विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान यावर तोडदा काढण्यासाठी राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज (दि.04) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसेच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा : Supriya Sule : भाजपने महागाईवरही रस्त्यावर उतरावं, सुप्रिया सुळेंनी केली अजितदादांची पाठराखण
महावितरण कंपनी खासगीकरण करण्यात येणार असल्याच्या हालचालींमुळे महावितरणचे कर्मचारी 3 दिवसांचा संपावर जाणार आहेत. महावितर ही कंपनी अदानी कंपनीला वीज वितरण करण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे. यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांना याचा मोठा फटका बसून मोठ्या प्रमाणात लुबाडण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे.
यामुळे ही परवाणगी नाकारण्यात यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रधान ऊर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली. मात्र ती फिस्कटल्यामुळे 72 तासाचा संप अटळ असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; भीमशक्ती, शिवशक्ती एकत्र; आज युतीची घोषणा!
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारल्याने सरकारने त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे सरकार आणि कर्मचारी यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस कर्मचारी संपावर ठाम राहिल्यास राज्यातील महत्वाचा शहरातील आणि ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडीत झाल्यास मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये विज पुरवठा खंडीत झाल्याने शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात विज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने रात्रीपासूनच लाईट बंद आहे. तर शहरातही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर असल्यानेही वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याचा फटका सामान्य नागरिकांवर बसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Electricity bill, Electricity cut, Maharashtra News