जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'दर्शन घ्यायला मी देव आहे का?' बाबासाहेबांनी 71 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्यानं लेखकाचं बदललं आयुष्य, Video

'दर्शन घ्यायला मी देव आहे का?' बाबासाहेबांनी 71 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्यानं लेखकाचं बदललं आयुष्य, Video

'दर्शन घ्यायला मी देव आहे का?' बाबासाहेबांनी 71 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्यानं लेखकाचं बदललं आयुष्य, Video

Maharinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भेटीमुळे या लेखकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 6 डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजही अनेक अनुयायी आहेत. बासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचून त्यामधील विचार समजून घेऊन अनेकांना प्रेरणा मिळाली. बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली मंडळी तर भाग्यवान समजली जातात. या महामानवाच्या एका भेटीनं आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याच्या आठवणी अनेक जण सांगतात. पुण्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी हे त्यापैकीच एक. बाबासाहेबांच्या भेटीनंतर आपल्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली याची आठवण, त्यांनी सांगितली आहे. 71 वर्षांपूर्वीची आठवण डॉ. न. म. जोशी  1951 साली 11 वर्षांचे होते. त्यावेळी ते शाळा शिकत पेपर टाकण्याचं काम करत. नारायण पेठेतील आचार्य ना. वा. तुंगार हे पाली भाषेचे अभ्यासक पंडित राहत होते. त्यांच्याकडे  ते वृत्तपत्र टाकत असतं. तुंगार यांच्याकडेच आपली बाबासाहेबांची भेट झाल्याचं जोशी सांगतात. ‘एके दिवशी सकाळी तुंगार काही कागदपत्रं घेऊन बाहेर उभे होते. मी तिथं अंक टाकायला गेलो त्यावेळी त्यांनी बाबासाहेब येणार असल्याचं मला सांगितलं., मी त्यानंतर घराबाहेर सायकल घेऊन थांबलो. काही वेळानं मोदी गणपतीसमोरुन एक काळ्या रंगाची गाडी आली. ती गाडी तुंगार यांच्या घरासमोर थांबली. बाबासाहेबांचा एक निर्णय आणि मराठवाड्याची दूर झाली मोठी अडचण, पाहा Video बाबासाहेबांनी जवळ बोलावलं आणि… त्या गाडीतून एक सुटाबुटातले बाबासाहेब आंबेडकर बाहेर आले. बाबासाहेब आणि तुंगार यांच्यातील बैठक झाली. त्यावेळी तुंगार यांनी माझी त्यांना आठवण करुन दिली. तो तुमच्या दर्शनासाठी थांबला असल्याचं तुंगार यांनी बाबासाहेबांना सांगितलं. त्यावर ‘मी काय देव आहे का?’ असा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आणि मला जवळ बोलावले. मी बाबासाहेबांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली. माझी विचारपूस केली. मी शाळा शिकतच पेपर टाकण्याचं काम करतो हे त्यांना सांगितलं. बाबासाहेबांनी माझ्याकडील अंक घेतला आणि मला त्यांनी एक रुपया दिला मी त्यातील माझे पेपर चे पैसे घेऊन उर्वरित पैसे बाबासाहेबांना देऊ केले तर त्यांनी मला म्हटले की मला पैसे परत नको देऊ त्या पैशांची तू पुस्तके आणि खूप शिक. मी त्या पैशाची पुस्तके घेऊन पुढे शिक्षण पूर्ण केले, अशी 71 वर्षांपूर्वी आठवण जोशी यांनी सांगितली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आयुष्याला कलाटणी बाबासाहेबांच्या भेटीनंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांच्या विचारानं प्रभावित होऊन मी बाबासाहेबांवर पुस्तक लिहिलं आहे. व्याख्यानं दिली असून एका इंग्रजी पुस्तकाचं अनुवादनही केलं असल्याचं जोशी यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात