मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मोठी बातमी! अखेर पुणे मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश, महानगरपालिकेची हद्द वाढणार

मोठी बातमी! अखेर पुणे मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश, महानगरपालिकेची हद्द वाढणार

23 villages of Pune to merge in PMC: पुणे महानगरपालिकेची हद्द आता आणखी वाढणार आहे. मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश करण्याचा अखेर निर्णय झाला आहे.

23 villages of Pune to merge in PMC: पुणे महानगरपालिकेची हद्द आता आणखी वाढणार आहे. मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश करण्याचा अखेर निर्णय झाला आहे.

23 villages of Pune to merge in PMC: पुणे महानगरपालिकेची हद्द आता आणखी वाढणार आहे. मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश करण्याचा अखेर निर्णय झाला आहे.

पुणे, 30 जून: पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या मागणीवर अखेर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर कऱण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्राच्या सीमात फेरफार करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये काही क्षेत्रे समाविष्ट करण्याचं म्हटलं होतं. त्यानुसार सर्व हरकती आणि सूचनांचा शासनाने विचार करत 23 गावांचा पुणे मनपात समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (merge of 23 villages in Pune Municipal corporation pmc)

ग्रामस्थांकडून निर्णयाचे स्वागत

पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही आता चालू होणार आहे. या निर्णयावर कृती समितीने स्वागत करत म्हटलं, हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट 23 गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे. पुणे शहर हे आता ख-या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर झाले आहे.

या 23 गावांचा पुणे मनपात होणार समावेश

म्हाळुंगे

सूस

बावधन बुद्रुक

किरकिटवाडी

पिसोळी

कोंढवे - धावडे

कोपरे

नांदेड

खडकवासला

मांजरी बुद्रुक

नऱ्हे

होळकरवाडी

औताडे-हांडेवाडी

वडाची वाडी

शेवाळेवाडी

नांदोशी

सणसनगर

मांगडेवाडी

भिलारेवाडी

गुजर निंबाळकरवाडी

जांभुळवाडी

कोलेवाडी

वाघोली

या 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करावा अन्यथा स्वतंत्र महानगरपालिका तयार करावी अशी मागणी ग्रामस्था आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार होत होती. तर राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते प्रवीण तुपे यांनी हडपसर मनपा निर्मितीची मागणी केली होती. पण अखेर आज राज्य शासनाकडून या 23 गावांचा समावेश पुणे मनपात करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

First published:

Tags: Maharashtra, Pune