मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Maharashtra Flood: '...म्हणून लगेच पूरग्रस्त भागाचा दौरा करत नाही' अजित पवारांनी सांगितलं कारण

Maharashtra Flood: '...म्हणून लगेच पूरग्रस्त भागाचा दौरा करत नाही' अजित पवारांनी सांगितलं कारण

Hence not immediately visited flood affected area said Ajit Pawar: कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पूरग्रस्त भागाचा दौरा का नाही करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 24 जुलै : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Extreme heavy rainfall) रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या महापुरात आणि दरड कोसळून (Landslide) झालेल्या दुर्घटनांत आतापर्यंत 70 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इतकी भीषण परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा का नाही करत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर स्वत: अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, कोयनात एकाच दिवशीत 16 टिएमसी पाणी जमा झालं, हे पहिल्यांदाच घडलं आहे. तळीये दरड दुर्घटनास्थळी पोहोचणंही प्रारंभी कठीण होतं. रायगडमध्ये तर सुरूवातीला हेलिकॉप्टर उतरायला जागा नव्हती, आता परिस्थिती सुधारत आहे. पुणे जिल्ह्यात 30 गावं ही दरड प्रवण क्षेत्रात मोडतात. पण रायगडमधील तळीयेमध्ये असं काही नव्हतंच. मी आत्ता पुण्यामध्येच आहे, बचावकार्याच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून पूरग्रस्त भागात जाणं टाळतोय.

'पुण्यात दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत वाढवून देण्यास मी सकारात्मक पण....' अजित पवारांचे मोठं वक्तव्य

9 जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. पुण्यात 1 जण दगावला आहे. रायगडमध्ये 53 लोक अजूनही बेपत्ता आहेत. अनेक घाटात दरडी कोसळल्यात ते हटवणं सुरू आहे. या महापुराच्या परिस्थितीत 90 हजार लोकांना आपण स्थलांतरीत केल आहे अशी माहितीही यावेळी अजित पवारांनी दिली आहे.

पूरस्थितीत बचाव आणि मदत कार्यसाठी एनडीआरएफच्या 31 टीम, वायूदलाच्या 14 टीम कार्यरत आहेत. कोयनातून 40 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टीत सध्या 2.75 लाख क्युसेकचा येवा पोहोचतोय तर त्यांनी 3 लाख क्यूसेकने पाणी सोडलंय. पूरस्थिती वाढू नये, यासाठी आपण ही दक्षता घेतोय अशी माहितीही यावेळी अजित पवारांनी दिली.

First published:

Tags: Ajit pawar, Maharashtra, Rain flood