वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 27 जुलै : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अल सफा या दहशतवादी संघटनेच्या रतलाम मॅाड्युलचा पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी आता तिसरा संशयित दहशतवादी अब्दुल कादीर दस्तगीर यालाही एटीएसने अटक केली आहे, त्याला 5 ॲागस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवादाचं अलसफा रतलाम मॅाड्युल काय आहे? अलसफा रतलाम मॅाड्युल? पुणे पोलिसांच्या रात्रगस्तीत सापडलेल्या दोन संशयित दहशतवाद्याच प्रकरण एटीएसकडे तपासाला आल्यानंतर एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे यायला सुरूवात झालीय. अलसफा या दहशतवादी संघटनेचे रतलाम मॅाड्युल आणि आणि त्याच्या सदस्याची सगळी माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. याप्रकरणात आता तिसरा संशयित दहशतवादी अब्दुल कादीर दस्तगीर याला अटक करण्यात आलीय. मूळचा गोंदियाचा असलेल्या अब्दुल कादीरला आधी अटक केलेल्या दोन दहशतवाद्याना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अल सफाच्या रतलाम मॅाड्युलमध्ये सक्रिय असणाऱ्या 9 जणांची माहिती एटीएसकडे आहे. त्यापैकी तीनजण अटक आहेत तर सहा जणांचा शोध सुरू आहे. याप्रकरणात दोन मुलींचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी दिल्लीतील जामिया मीलीयाची विद्यार्थिनी असलेली अलिफिया नामक अल सफाची सक्रिय महिला ही एटीएसच्या रडारवर आहे. हे मॅाड्यूल इंडियन मुजाहिदीनचीच पुढची आवृत्ती असल्याच एनआयएनेही म्हटलं आहे. वाचा - पती कर्ज फेडू शकला नाही, सावकाराचा पत्नीवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन केला व्हायरल महाराष्ट्र एटीएसच्या तपासात अलसफा रतलाम मॅाड्युलची समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. या संशयित दहशतवाद्यांनी पुण्यात कामशेत, अलिबाग आणि कोल्हापुरात चांदोली अभयारण्याजवळ बेस कँप करता येईल याचीही रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचं उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.