जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरुडमध्ये ठिकठिकाणी झळकले असे पोस्टर्स

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरुडमध्ये ठिकठिकाणी झळकले असे पोस्टर्स

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरुडमध्ये ठिकठिकाणी झळकले असे पोस्टर्स

भाजपने 52 विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी दिली असून 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे,4 ऑक्टोबर: विद्यमान आमदार मेघा कुलकर्णी यांना डावलून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघातून नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढेच नाही तर आमदार मेघा कुलकर्णी यांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांना कडाडून विरोध केला आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी 100% नोटाला मतदान करा, असे काळ्या रंगाचे पोस्टर्स झळकले आहे. 100 टक्के नोटा (NOTA)ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने 52 विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी दिली असून 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. त्यात 12 आमदारांमध्ये कोथरुडच्या मेघा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने मनसेचे कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी याबाबत माहिती दिली. कोथरुडमध्ये वाहताहेत बंडाचे वारे.. चंद्रकांत पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागले होते. जातपात आणि स्थानिक-बाहेरचा असा वाद पेटला होता. त्यामुळचे अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वपक्षासोबतचे मित्रपक्षातील बंडोबांना थंड करण्याची कसरत चंद्रकांत पाटलांना करावी लागली. थेट जनतेतून निवडून येण्याचे पवारांनी दिलेले आव्हान चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वीकारलचे नाही तर यापुढे पुण्यावर आपलचे वर्चस्व राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसेच पाटील यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांचे एकच उमेदवार असावा, यासाठीही प्रयत्न केला जात होता. आता राष्ट्रवादीने याबाबत भूमिका घेत आपला पाठिंबा मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर केला आहे. दरम्यान, भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. VIDEO: प्रकाश मेहतांच्या समर्थकांकडून पराग शाहांच्या गाडीची तोडफोड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात