चिमुकल्याचं मोठं दातृत्व, 3 वर्षीय मुलाने कपकेक विकून कमावलेले 50 हजार दिले मुंबई पोलिसांना

चिमुकल्याचं मोठं दातृत्व, 3 वर्षीय मुलाने कपकेक विकून कमावलेले 50 हजार दिले मुंबई पोलिसांना

एका तीन वर्षांच्या चिमुकल्यानं त्याच्या कमाईतून 50 हजार रुपयांची मदत मुंबई पोलिसांना केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : सध्या सोशल मीडियावर एका तीन वर्षांच्या मुलाचं कौतुक होत आहे. त्यानं कमावलेले पैसे मुंबई पोलिसांना दान केले आहेत. मंगळवारी सकाळी कबीर नावाचा एक चिमुकला त्याच्या आई वडिलांसह मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला होता. त्यावेळी चिमुकल्याने 50 हजार रुपयांचा चेक दिला. कबीरने हे पैसे कपकेक विकून कमावले होते. फक्त मुंबई पोलीसच नाही तर सर्वच स्तरातून मुलाच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. त्यासाठी त्यानं घरीच कपकेक तयार केले होते. मात्र ते विकून कबीरने त्याला कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले.

कबीर मंगळवारी सकाळी त्याच्या आई वडिलांसह मुंबई पोलीस मुख्यालयात पोहोचला. पोलिस कमिश्नर परम बीर सिंग यांच्याकडे त्यानं 50 हजार रुपयांचा चेक सोपवला. मुंबई पोलिसांनी ट्विटर हँडलवरून त्याचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, 3 वर्षांच्या या बेकरकडे मुंबई पोलिसांसाठी मोठं सरप्राइज होतं. कबीरनं त्याच्या कमाईतून मुंबई पोलीस फाउंडेशनसाठी एक मोठं योगदान दिलं आहे.

सोशल मीडियावर हे ट्वीट थोड्याच वेळात व्हायरल झालं. एका युजरनं म्हटलं की, हे प्रेरणादायी आहे. तर अनेकांनी कबीरचं कौतुक केलं आहे. कबीर कपकेक्स फॉर चॅरिटीवरून त्याचे फोटो शेअर कऱण्यात आले आहेत.

हे वाचा : गावी जाण्यासाठी ई पास हवाय का? पोलिसांनी सांगितलेल्या अटी वाचा

First published: May 13, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading