मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

सुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, "त्यांना त्याच्या राज्यात..."

सुरेखा पुणेकरांचा राज्यपालांवर निशाणा, म्हणाल्या, "त्यांना त्याच्या राज्यात..."

राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यानंतर सुरेखा पुणेकरांनी त्यांच्यावर टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 9 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं विधान राज्यपालांनी केलं आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यानंतर आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुरेखा पुणेकर -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यानंतर सुरेखा पुणेकरांनी त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी आपल्या आराध्य दैवताबाबत केलेलं विधान अत्यंत चूकीचे आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, अशा प्रकारचे विधान भाजपाबाह्य व्यक्तीने केलं असते तर त्याच्यामागे चौकशीचा फेरा लावला असता.

तसेच भाजपामध्ये महिलांबद्दलसुद्धा कोणत्याही प्रकाराचा सन्मान राखला जात नाही, हे अनेक उदाहरणामधून स्पष्ट होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  राज्यपालांना परत त्यांच्या राज्यात पाठवा’, अशी मागणी करत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महाराजांवरील वक्तव्यावरुन संभाजीराजे भडकले, म्हटले मोदींनी..

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Governor bhagat singh, Maharashtra politics