मावळ, 2 जुलै : मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असताना सुद्धा धोकादायक पर्यटनामुळे अद्याप तीन विविध घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना सुखरुप वाचविण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. 28 जून रोजी सेल्फीच्या नादात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. तर दहा वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप वाचविण्यात आले होते. त्यानंतर 1 जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या लोणावळ्यातील कुसगाव येथील दगडाच्या खाणीत बुडून पिंपरी चिंचवड येथील दोघांचा मृत्यू झाला होता. आज दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव येथील कुंड माळ्यावर आई-वडिलांची नजर चुकवून पाण्याच्या प्रवाहात पाय घसरुन पडलेल्या आठ वर्षीय शुभ्रा पिसाळ हिला वेळीच मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर मागील आठ दिवसात चौघांचा मृत्यू तर दोघांना सुखरूप वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. हे ही वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील कार-कंटेनरच्या भीषण अपघाताचा Live Video आला समोर पर्यटन बंदी असतानाही पुण्यातून तळेगाव येथील कुंड मळ्यावर पर्यटनासाठी आपल्या आई-वडिलांसोबत आलेल्या आठ वर्षीय शुभ्रान पालकांची नजर चुकवून वाहत्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाय घसरुन ती पाण्यात पडली, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शुभ्रा पाण्यातून वाहू लागली. तिच्या आई-वडिलांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच वाहून जाणाऱ्या शुभ्राला पाहून तय्यब शेख तसेच सचिन चव्हाण या दोघांनी पाण्यात उडी टाकत बुडणाऱ्या शुभ्राला सुखरूप वाचवलं. कुंडमळा येथील बजरंग दलाच्या तरुणांनी लोखंडी शिडीच्या मदतीने संकटात सापडलेल्या शुभ्रा तय्यब तसेच सचिन तिघांनाही सुखरूप वाचवले आहे. मावळात पर्यटन बंदीच्या शासनाच्या आदेशाला झुगारून अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटन करत आहेत. त्यामुळे अवघ्या आठ दिवसात चौघांचा मृत्यू तर केवळ दैव बलवत्तर असल्याने दोन चिमुकल्यांचा जीव वाचला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.