पुणे, 20 जुलै : नंदी हे भगवान शंकर यांचं वाहन आहे. तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात गेलात की तिथं नंदीची मूर्ती नक्की आढळते. ‘मी जिथं बसेन तिथं तू ही असशील’, असं वरदान शंकरानंच नंदीला दिलं होतं. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती आढळते. शिवमंदिरात गेल्यावर अनेक जण शिवाची पूजा करण्याबरोबरच नंदीची पूजाही करतात. त्याचवेळी आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगण्याची पद्धत आहे. नंदीच्या कानात ही इच्छा का सांगावी? त्याचबरोबर ती सांगण्याची काय पद्धत आहे? याबाबत पुण्यातल्या विद्याधर काळे गुरुजी यांनी माहिती दिली आहे. काय आहे परंपरा? ‘भगवान शंकर सर्वाधिपदी आहेत. नंदिकेश्वर म्हणजेच नंदी हे शंकराचे वाहन आहे. नंदिकेश्वर म्हणजे पूर्वजन्मीचे श्रीपादस्वामी. महामुनी श्रीपादस्वामी हे महादेवाचे निश्चिंत भक्त होते. पूर्वजन्मी त्यांनी महादेवाची मोठी तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न केले. शंकराला प्रसन्न केल्यानंतर श्रीपाद स्वामी यांनी त्यांच्याकडे एक वर मागितला ज्या त्यांनी की मला तुमच्याजवळ आढळ स्थान म्हणजेच कायम स्वरूपी स्थान पाहिजे.
भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना जवळचं स्थान दिलं. त्यामुळे आपल्याला शंकराला नमस्कार करताना काही सांगायचं किंवा मागायचं असेल तर ते प्रथम नंदीकडं मागावे,’ असं काळे गुरुजी यांनी सांगितलं. काळे रत्न धारण केल्यानं नशीब बदलतं का? वाचा काय होतो परिणाम? ‘प्रत्यक्ष पूजा शंकराची कुठेही होत नाही, त्यामुळे शंकर भगवान यांच्या पर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर ती नंदकिशोर त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. आपलं म्हणणं नंदकिशोरला सांगायचं. आपल्या मनातील भावना अतिशय हळुवारपणे आणि सामान्य आयोगामध्ये फक्त मनामध्ये असलेली भावना व्यक्त करावी. म्हणजे ती शंकरापर्यंत पोहोचेल, ही परंपरा शताकानुशतके चालत आली आहे,’ असं काळे गुरूजी यांनी स्पष्ट केलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)