पुणे, 23 फेब्रुवारी : पुण्यात कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने आपली संपूर्ण फौज मैदानात उतरवली आहे. पण, भाजपला आता मोठा धक्का बसला आहे. दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मात्र, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा केल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का मानला जात आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण आहे. अशातच उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
(Maha Political Crisis : शिंदे गुवाहाटीला का गेले? राज्यपाल योग्य की अयोग्य? कोर्टात मोठा ड्रामा)
अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष कै.अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उभारणीत गोडसे परिवारच एक मोठं योगदान असून अक्षय यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये आता जोरदार चर्चा रंगली आहे.
(Maha Political Crisis :...म्हणून सरकार कोसळलं, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' चुकीवर कोर्टाने ठेवलं बोट)
महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं आणि माझ्या परिवाराचं गेल्या अनेक वर्षाचं नात आहे. माझे आजोबा दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोक गोडसे आणि माझ्या पर्यंत त्यांचं अत्यंत स्नेहाच नातं आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसाला धंगेकर हे तब्बल 1 हजार भगवद गिताचे पुस्तके त्यांच्या प्रभागात वाटत होते. गेली अनेक वर्ष त्यांचं आणि आमचं स्नेहाच संबंध आहे. आमच्या परिवाराचं त्यांना पाठबळ आहे, असं गोडसे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.