पुणे, 15 फेब्रुवारी : पुण्यात आयकर विभागाने जवळपास आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. अनिरुद्ध देशपांडे यांच्यावरही छापेमारी ते पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत तसंच ते शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पुण्यात आज आयकर विभागाने 8 ठिकाणी छापे टाकले आहे. सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray : हरीश साळवेंनी उद्धव ठाकरेंची ती बाजू आणली समोर, कोर्टानेही नोंदवलं मत) देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील ही तपासणी केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिंदे गटाचा कोर्टात मोठा दावा, उद्धव ठाकरेंच्या खेळीवर ठेवले बोट) पुण्यातील बडे प्रस्थ असलेल्या देशपांडे यांच्यावर प्राप्तिकर विभागाची छापीमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकाराण्यांशी सलोख्याचे आणि निकटचे संबंध आहेत. देशपांडे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.