जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात पैशासाठी बायकोचा सौदा; 3 हजार रुपये घेऊन केले मित्रांच्या हवाली, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

पुण्यात पैशासाठी बायकोचा सौदा; 3 हजार रुपये घेऊन केले मित्रांच्या हवाली, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुण्यात एका पतीने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केलं.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 4 एप्रिल : पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशासाठी पत्नीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला भाग पाडत 3 हजार रुपयांसाठी मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा प्रकार समोर आला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पैशाच्या लोभापाई पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर अवघ्या तीन हजार रुपयात पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले. याप्रकरणी एका 25 वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीसह आदित्य गौतम (रा.कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवर डिसेंबर 2020 पासून मे 2022 दरम्यान होत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पतीला पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. तसेच मारहाण करत उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आरोपीने आपल्याच दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेतले आणि स्वतःच्या पत्नीला त्यांच्या ताब्यात सोपवले. दीड वर्षाच्या चिमुकल्याला सोबत घेऊन जन्मदात्या महिलेचं टोकाचं पाऊल, भयानक घटना तसेच पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई पुढील तपास करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात