धर्मेंद्र शर्मा, प्रतिनिधी करौली, 4 एप्रिल : देशात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केली. राजस्थान राज्यातील हिंडौनच्या जटनगला गावात ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंडोन रुग्णालयात पाठवण्यात आला. डीएसपी किशोरीलाल यांनी सांगितले की, जटनगला गावात राहणारी महिला शारदा गौतम जाटव (30) आणि दीड वर्षाचा मुलगा आरुष हिला लटकलेल्या अवस्थेत आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी हिंडौन शवागारात पाठवले. यानंतर मृत महिलेचा पती गौतमला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटना घडली त्यावेळी शारदा ही तिचा मुलगा आरुषसोबत घरी एकटी होती. तिचा पती गौतम दिल्लीत मार्बल इन्स्टॉलेशनचे काम करतो. तो रविवारी घरी येण्यासाठी दिल्लीहून ट्रेनने निघाला होता. मात्र, रात्र झाली असल्याने तो बनकी या गावी बहिणीच्या घरी गेला होता. तेथून सकाळी 10 वाजता तो जटनगला येथे त्याच्या घरी पोहोचला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर तो घराबाहेर पडला. यानंतर अपघाताची माहिती मिळताच गौतम घरी परतला. सध्या पोलीस मृत महिलेचा पती गौतमची चौकशी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच डीएसपी किशोरीलाल, सुरौथ पोलिस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक प्रल्हाद सिंह, सहायक उपनिरीक्षक राजवीर सिंह, कॉन्स्टेबल भंवर सिंह घटनास्थळी पोहोचले. पोलीस चौकशीमध्ये शारदाचे सासरे सुंदर जाटव यांनी सांगितले की, शारदा सकाळी मुलगा आरुषसोबत खोलीत होती. घराच्या एका भागात म्हैस बांधलेली असते. सकाळी म्हशीचे दूध काढल्यावर ते दुसऱ्या घरात गेले. शारदा तिचा मुलगा आरुष आणि पतीसोबत 4 खोल्यांच्या घरात राहत होती. तर कुटुंबातील इतर सदस्य वेगवेगळ्या घरात राहतात. सकाळी अकराच्या सुमारास मी म्हशींची देखभाल करण्यासाठी परत आलो असता एका खोलीला आतून कुलूप होते. बराच वेळ फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. लोखंडी दरवाजा धडक दिल्यानंतर आतील साखळी तुटली. यावेळी खोलीत सून आणि नातवाचा मृतदेह पाहून पायाखालची जमीन सरकल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.