पुणे, 03 नोव्हेंबर: श्रीलंका आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rainfall in maharashtra) हजेरी लावली आहे, गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainfall) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
खरंतर, देशात सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
लक्षद्विप-द/पु अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र.3 दिवसात वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता.लक्षद्विप-कर्नाटक किनारपट्टीत द्रोणीय स्थिती.यामुळे पुढचे 4-5 दिवस,द कोकण,द मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे 6-7 हलका पाऊस pic.twitter.com/YHcIA4SQ42
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 3, 2021
पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असेल. यासोबतच रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांत देखील आज अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.
हेही वाचा-पुणेकरांनो...लस घ्यायला जात असाल तर ही बातमी वाचून घराबाहेर पडा
उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची धुवाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे, शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाण्यात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. सध्या लक्षद्विप दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे. पुढील तीन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र