नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 17 एप्रिल : सध्या डिजिटल घड्याळांच्या जमान्यामध्ये अनेकांना आपल्या आजी-आजोबांच्याकडील जुनी चावीची घड्याळे आठवतच असतील. ही घड्याळे तर त्यावेळेस अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध तर असायचे. मात्र, अजूनही ती चालत आहेत याबद्दल अनेकांना विश्वास बसणार नाही. पण होय हे खरं आहे. पुण्यातील गौतम दांडेकर हे 100 वर्षांहून अधिक जुने घड्याळे दुरुस्त देखील करतात आणि त्यांच्याकडे तब्बल साडेसहाशे जुन्या घड्याळांचे कलेक्शन आहे. कधी पासून करतात काम? बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान बदलले आणि चावीची घड्याळे मागे पडले. पण त्यांचे सौंदर्य आजही अनेकांना भुलवणारे आहे. अशाच घड्याळांच्या प्रेमामध्ये पुण्यातील गौतम दांडेकर आपले सर्वस झोकून दिले आहे. वसंत विहार सोसायटी, कोथरूड येथे राहणारे गौतम दांडेकर यांचे शिक्षण इंटेरियर डिझाईन झालेले मात्र, आवड म्हणून ते वीस वर्षापासून चावीच्या घड्याळांची दुरूस्त घरातूनच करत आहेत.
घड्याळ घरीच तयार करतात गौतम दांडेकर जवळपास साडेसहाशे जुन्या घड्याळांचा संग्रह आहे. फक्त जुन्याच घड्याळांना दुरूस्त करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे. दांडेकर यांनी 1880 ते 1940 पर्यंतची बंद असलेली चावीची घड्याळे दुरूस्त केली आहेत. ते फक्त घड्याळे दुरुस्त नाही करत तर अशी चावीची जुन्या पद्धतीची घड्याळ देखील ते घरच्या घरीच तयार करतात. यासाठी ते मशिनद्वारे घड्याळाचे साहित्य,वेगवेगळे भाग ते बनवतात. यामध्ये खासियत म्हणजे दांडेकर हे उलट्या आकड्यांची घड्याळ बनवण्यासाठी माहीर देखील आहे. त्यांनी अशी घड्याळे देखील बनवले आहेत यासोबतच त्यांच्याकडे विविध घड्याळांची मागणी देखील असते. या घड्याळांची देखील विविधता आहे. काही घड्याळ अशी असतात की त्यांना दर 24 तासाने चावी द्यावी लागते. आणि त्यातील काही घड्याळ बारा वाजता वेगळा टोल, तीन वाजता वेगळा टोल, सहा वाजता वेळ काढून नऊ वाजता वेगळ्या आवाजाचा टोल अशी देतात. तर काही घड्याळे ही प्रत्येक तासाचा एका विशिष्ट टोल देतात. काही घड्याळे ही त्यांच्याकडची बारा वाजले की एक मोठा टोल आणि त्यामागे जेवढे मिनिट झाले असतील तेवढे टोल देतात. अशी असंख्य म्युझिक वाली घड्याळे त्यांच्याकडे आहे. यासोबतच ॲनिवरसरी घड्याळ नावाचा एक प्रकार आहे हे घड्याळ आहे ते वर्षातून एकदाच तुम्हाला चावी द्यावी लागते. अशी असंख्य घडळ्यांचे प्रकार गौतम यांच्याकडे आहेत.
पुणेकरांना येणार नाही ट्रॅफिक जामचा कंटाळा, रिक्षाचालकानं शोधली भन्नाट आयडिया, पाहा Video
कोणतीही जुनी घड्याळ करतात दुरुस्ती माझ्याकडे जुने चावीचे घड्याळ होते. 25-30 वर्षांपूर्वी ते बिघडल्यावर ते दुरुस्तीसाठी टाकले होते. आणि घड्याळ दुरुस्त झाल्यानंतर परत ते पंधरा-वीस दिवसांनी बिघडले. यामुळे मी स्वतः घड्याळ दुरुस्ती करण्याचे शिकून घेतले. यासाठी मी पुण्यातील जुन्या बाजारात जाऊन तिथून यंत्रसामग्री आणत असे. दोन-तीन वर्ष दुरुस्तीसाठी शिकणे अवघड गेले. मात्र आता एवढा ह्या मध्ये हातखंड बसला आहे की जगभरातील कोणतीही जुनीतली जुनी मेकॅनिकल चावीचे घड्याळ मी दुरुस्त करू शकतो. जशी तशी बनवू देखील शकतो. त्यासाठी मी त्या पद्धतीची विविध यंत्रसामग्री आपल्या घरी आणून ठेवले असून याद्वारे ते मी आपले काम करत असतो. यामध्ये मला माझ्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे, असं गौतम यांनी सांगितले. संपर्क : +91 98222 71730

)







