सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली. याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.या आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. pic.twitter.com/n0OJFxpJtX
— News18Lokmat (@News18lokmat) September 13, 2021
पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या आणि जवानांकडून आग विझवण्यात आली. सुदैवानं या आगीच्या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.बावधान बुद्रुकमधील बिग बास्केट या ऑनलाइन किराणामाल आणि भाज्या विक्री करणाऱ्या गोडाऊनला आग pic.twitter.com/rANLF6F0uD
— News18Lokmat (@News18lokmat) September 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune