काही वापरकर्त्यांनी इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, की इतरांना तू नेहमी जगायचं कसं हे शिकवून गेला. मात्र, तरीही तू स्वतःच आत्महत्येचं पाऊल का उचललं असा भावनिक सवाल इन्स्टाग्रामवरुन अनेकजण करत आहेत. समीरचे अनेक व्हिडीओ गेल्या 2 दिवसांमध्ये शेअर केले गेले आहेत. मनोज चौधरी नावाच्या एक यूजरनं समीरचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तुझा निर्णय चुकला समीर भाई, तू गेल्याचं दुःख आहे पण त्या आईला का वाटत असेल जिचा एकुलता एक मुलगा सोडून गेला. तुझ्यासाठी असा व्हिडीओ बनवावा लागेल, वाटलं नव्हतं असं म्हणत हा चाहता भावूक झाला आहे. तर, दुसऱ्या एका चाहत्यानं व्हिडीओ शेअर करत म्हटलं, की समीर दादा तू तुझ्या प्रत्येक व्हिडीओमधून आम्हाला काही ना काही शिकवायचा आणि आज तुच सोडून गेलास. समीरचे अनेक चाहते त्याच्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आहे.View this post on Instagram
समीरनं नेमकी आत्महत्या का केली. लोकांना जगायचं कसं हे शिकवणाऱ्या समीरला इतका टोकाचा निर्णय का घ्यावा लागला, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. मात्र, हे सगळे प्रश्न अजूनही निरुत्तरीत आहे.View this post on Instagram
समीरच्या आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. समीरजवळ सुसाईड नोटही सापडली नसल्यानं त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. समीरच्या भावानं याबद्दल पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Person suicide, Samir gaikwad, Tiktok star