जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / अविनाश भोसलेंना EDचा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसलेंना EDचा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसलेंना EDचा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता (Property worth 4 crore) सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्त केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 ऑगस्ट : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता (Property worth 4 crore) सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्त केली आहे. ABIL अर्थात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची ही जमीन असून त्यावर सुरु असणारं बांधकाम बेकायदेशीर असल्याच्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. ईडीच्या रडारवर गेल्या काही महिन्यांपासून उद्योजक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात त्यांची तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. आर्थिक अफरातफर प्रकऱणात ही चौकशी सुरु असून भोसले यांनी बेकायदा पद्धतीने काळ्या पैशांचा व्यवहार केला असल्याचा संशय ईडीला आहे. काय आहे प्रकरण पुण्यातील एका सरकारी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून बांधकाम केलं जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकऱणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या इतर अनेक व्यवहारांचीदेखील ईडीकडून तपासणी केली जात आहे. संशयास्पद व्यवहार अविनाश भोसले यांची सध्या जप्त करण्यात आलेली जमीन ही 40 कोटी 34 लाख रुपयांची आहे. भोसले यांनी पुण्यातील आणि नागपुरातील ही जमीन फेमा कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसलेंनी दक्षिण मुंबईत खरेदी केलेल्या 103 कोटी 80 लाख रुपयांच्या एका फ्लॅटचीदेखील सध्या चौकशी केली जात आहे. या प्रकरणात ईडीनं  11 फेब्रुवारी या दिवशी भोसलेंच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी अविनाश भोसले आणि अमित भोसलेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र हे दोघंही चौकशीला हजर राहिले नाहीत. हे वाचा - 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी कोण आहेत अविनाश भोसले गरीबीतून सुरुवात करून आपलं साम्राज्य उभे करणारे उद्योगपती म्हणून अविनाश भोसलेंची ख्याती आहे. एका रिक्षावाला म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या भोसलेंनी काही वर्षातच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. एबीआयएल या ग्रुपचे ते मालक असून मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात