सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल. औषध नियामकांनी या वर्षी मे महिन्यात भारत बायोटेकला मुलांवर चाचण्या घेण्याची परवानगी दिली होती. ही चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली. 6 ऑक्टोबर रोजी कंपनीने पडताळणी आणि आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी डेटा CDSCO ला सुपूर्द केला. ही लस प्री फिल्ड सिरिंज असणार आहे. त्यातही 0.5 मिलीचा डोस असेल. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाबतीत, जास्त डोसमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मुलांच्या लसीसाठी PFS यंत्रणेवर जोर देण्यात आला. आधी भरलेली 0.5 मिली लस एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावी लागेल. मुलांना लसीचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील.#JustIn | Subject Expert Committee recommends market authorisation for emergency use of #Covaxin for the age group of 2-18 years pic.twitter.com/meve92MgJI
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) October 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination