मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

pune daund murder case : रक्ताच्या नात्यातील 7 जणांना का संपवलं? करणी की आणखी काय? पोलिसांनी केला खुलासा

pune daund murder case : रक्ताच्या नात्यातील 7 जणांना का संपवलं? करणी की आणखी काय? पोलिसांनी केला खुलासा

यामध्ये करणी आणि जादूटोण्याचा कोणताच प्रकार नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

यामध्ये करणी आणि जादूटोण्याचा कोणताच प्रकार नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

यामध्ये करणी आणि जादूटोण्याचा कोणताच प्रकार नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 25 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील दौंडमधील हत्याकांड प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. एकापाठोपाठ 7 जणांची हत्या करून मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिली होती. अखेर या प्रकरणी सख्या चुलत भावांना अटक करण्यात आली आहे. भावाच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्याची हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच, यामध्ये करणी आणि जादूटोण्याचा कोणताच प्रकार नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात सहा दिवसात 7 मृतदेह सापडले असुन यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे 7 ही खून चुलत भावाने केले असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलीस तपास अधिकारी अंकित गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा केला.

एकूण ७ मृतदेह आम्हला मिळाले होतेय. गंभीर प्रकार लक्षत घेता आम्ही अनेक पथक तयार केले होते. काही पुरावे समोर आले आणि लक्षात आलं की हा घातपात करुन त्यांचा खून करण्यात आला आहेय पाच आरोपी अटकेत आहेत त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी आहे. हे नात्यातलेच आणि एकाच गावातले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

(pune daund murder case : मुलाच्या मृत्यूचा बदला, जादूटोण्याचा संशय अन् चुलत भावांनीच भावासह 7 जणांना संपवलं)

आरोपी अशोक पवार यांचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला कारणीभूत हे पवार कुटुंब होत अस मनात धरून आणि त्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. करणी सारखा कुठलाही प्रकार समोरं आला नाही. कुणीही आय व्हिटनेस नव्हता, असंही पोलिसांनी सांगितलं.

चार भाऊ एक बहिण आरोपी हे सख्खे भाऊ बहीण आहे. अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव (बहीण) अशी आरोपींची नावं आहे. सगळ्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मोहन पवार यांचा चुलत भाऊ अशोक कल्याण पवार यानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण ही बाब मोहन पवार यांनी भावाला सांगितली नाही. 4 दिवसांनी मुलाच्या अपघाताची बातमी मारेकरी चुलत भावाला मिळाली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला.

(आधी दोन मुलांना ढकललं नंतर स्वतः घेतली गोदावरीत उडी; 27 वर्षीय आईचं धक्कादायक पाऊल)

आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून अशोक पवार याने मोहन पवार यांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले. मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी मृतांची नाव आहे.

तर, अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. आपल्या मुलावर करणी केला असा संशय सुद्धा या आरोपींना होता.

First published:

Tags: पुणे