पुणे : MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात आपलं नाव कमवणाऱ्या दर्शना पवार आणि तिच्या कुटुंबाचा आनंद फार काळ टिकला नाही. दर्शनाची हत्या झाल्याचं समजलं आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या हत्या प्रकरणातील गूढ उकलण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. दर्शनासोबत असलेला राहुल हंडोरेला पोलिसांनी अटक केली आहे. हा राहुल हंडोरे नक्की कोण? त्याचा या हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे जाणून घेऊया. राहुल हंडोरे हा दर्शना पवारचा मित्र होता. जेव्हा दर्शनाने MPSC परीक्षेत उत्तम क्रमांक काढला त्यानंतर तिचं कौतुक होऊ लागलं. तिला सत्कारासाठी बोलवण्यात आलं. हा सत्कार सोहळा झाल्यानंतर राजगडावर मित्रासोबत ट्रेकिंगला गेली होती. त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेनंतर दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिली आहे. दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत.
Darshana Pawar : दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर, राहुलच्या अटकेनंतर खुलासादर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावचा रहिवासी आहे. त्यांनी B.Sc केले. त्यानंतर तो पुण्यात एमपीएससीची तयारी करत होता. गेल्या काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल चांगलेच संपर्कात होते. ही ओळख वापरून दोघेही ट्रेकिंगला गेले असताना ही घटना घडली.

)







