पुणे, 15 मे: तौत्के चक्रीवादळ (Cyclone Tauktae) अरबी समुद्रावर घोंघावत आहेत. अरबी समुद्रावर अग्नेय भागातून उत्तर-वायव्य दिशेला चक्रीवादळ सरकत असून त्याची वाटलाच खूपच वेगाने होताना दिसत आहे. या चक्रीवादळाचे रुपांतर पुढील काही तासांत तीव्र चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह पुणे (Cyclone Tauktae in Pune) आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 11 झाडांची पडझड पुण्यात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रात्री 9 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास 11 झाडांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाहीये. पुण्यातील येरवडा, कोंढवा, कोथरुड, हडपसर, मुकुंदनगर, कल्याणीनगर, धनकवडी, कात्रज, कसबा पेठ याठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी, जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यावर चक्रीवादळाचा कधी आणि काय परिणाम होणार? हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तौत्के हे चक्रीवादळ पूर्व-मध्य व लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर घोंघावत आहे. उत्तरपूर्व राजस्थान व लगतचा भाग ते मराठवाडा (पश्चिम मध्य प्रदेशमार्गे) कमी दबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे 16 मे 2021 रोजी पुणे जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Cyclone Tauktae: तौत्के वादळाचा तडाखा; अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्या सारखे कोसळले घर, पाहा LIVE VIDEO 17 मे 2021 पुण्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 18 मे 2021 पुण्यात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपार किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
येत्या 2,3 दिवसात,अरबी समुद्रामधील तौत्के चक्रीवादळामुळे राज्यात खासकरुन कोकणात व मध्य महाराष्र्टासाठी दिले गेलेले हवामान संबधी इशारे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2021
IMD pic.twitter.com/tJ8rHhAfFl
19 मे 2021 आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 मे 2021 आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळी सामान्यत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काय परिणाम होईल? तौत्के चक्रीवादळामुळे 16 मे रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस सुद्धा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे दक्षिम णहाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर 16 मे रोजी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग हा 80 किमी प्रति तास इतका वाढण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळाचा कोकणावर काय परिणाम होणार? 16 मे 2021 बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस पडण्यासोबतच किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 17 मे 2021 बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.