Home /News /pune /

पुण्यात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांची तोबा गर्दी, मृतदेहाचे पाय धुवून पाणीही प्यायलं!

पुण्यात अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांची तोबा गर्दी, मृतदेहाचे पाय धुवून पाणीही प्यायलं!

Pune News : नातेवाईकांनी अंत्यसंस्कादरम्यान मृतदेहाचे पाय धुवून पाणी प्यायल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे, 20 एप्रिल : पुण्यात सध्या कोरोनाच्या (Pune coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असं असतानाही लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. इतकेच नाही तर नातेवाईकांनी अंत्यसंस्कादरम्यान मृतदेहाचे पाय धुवून पाणी प्यायल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मयत व्यक्तीला घरातील महिलांनी मृतदेहाला शेवटची आंघोळ घातली आणि ते पाणी प्यायल्याची माहिती मिळत आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वीची असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, मयत वयोरूद्ध पेशंट हे अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांचा कोरोना रिपोर्ट देखील पॉजिटिव्ह नव्हता, तसंच त्यांच्या घरातील व्यक्तींना अद्याप तरी कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फक्त अंत्यसंस्कारासाठी अनावश्यक गर्दी जमा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना दिली आहे. हेही वाचा - Corona फोफावतोय! भारताला या विळख्यातून बाहेर काढू शकतील फील्ड हॉस्पिटल्स, वाचा सविस्तर दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाने रौद्र रुप धारण केलं आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र काही नागरिक अजूनही बेजबादार कृत्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अशातच लोणी काळभोरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या