पुणे 21 जुलै: पनवेल पाठोपाठ पुण्यातील (Pune) कोविड सेंटरमध्येही (Covid Care Center Pune) महिला पेशंट्सच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड कॉलेज कोविड सेंटरमध्ये काल राञी 12 वाजता एका महिला पेशंट्सच्या दारावर जोरदार धक्के मारले गेल्याचा प्रकार घडला. संबंधित महिलेनं घाबरून 100 नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे (Pune Police) पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली. आज या पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला पेशंट्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्री 27 वर्षीय कोरोना बाधित महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून अज्ञात व्यक्तीने जोरजोराने ठोठवल्याची घटना घडली. संपूर्ण रात्र जागूनच घाबरलेल्या अवस्थेतच त्या महिलेने काढली. सकाळी तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना फोनवरून सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या कक्षात इतर महिलांसोबत राहण्यास पाठविले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरला धमकी सिंहगड कॉलेजमध्ये एकूण 5 हॉस्टेल प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी 1500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 14जुलै रोजी धायरी येथील 27वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाच्या वतीने त्या महिलेस वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज च्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाबाबत पुणे शहरातून चिंताजनक आकडेवारी, तर ग्रामीण भागात दिलासा विनयभंगाचा प्रकार हा अत्यंत भयानक व गंभीर असून महिलेच्या सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. अशा कर्मचाऱ्याला कठोर शासन झाले पाहिजे. यासाठी महापालिका आयुक्त यांनी विशेष लक्ष घालून, तपास करून संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.