मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरलाच दिली धमकी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरलाच दिली धमकी

आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचे फोन कोणालाच केले नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर फोन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही दिला.

पिंपरी-चिंचवड 21 जुलै: कोरोनाग्रस्तांना (Coronavirus Patient) मदत करण्यासाठी 25 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास बघून घेऊ अशी धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचा फोन पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित रुग्णालयात आल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp State President Chandrakant Ptil ) बोलत असल्याचं सांगितलं. शिवाय पैसे घेण्यासाठी पर्वतीमधील एका कार्यकर्त्यास पाठवत असल्याचंही तो म्हणाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत फोन करणाऱ्या भामट्याचा शोध सुरु केला आहे.

मात्र रुग्णालयातील डॉक्‍टर भाजप नेत्यांच्या चांगलेच संपर्कात असल्याने त्यांनी याबाबत थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचे फोन कोणालाच केले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर फोन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर या प्रकरणी  निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या राज्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपआपल्या परीने गोरगरिबांना मदत करीत आहे. त्याचाच फायदा घेऊन काही भामटे राजकीय पक्षाच्या नावाने सामान्यांना गंडवत असल्याचा हा  प्रकार असल्याच शंका व्यक्त केली जात आहे.

काळ आला होता पण..,माळशेज घाटात कारसमोरच कोसळला भलामोठा दगड, आणि...

याबाबत बोलतांना पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर म्हणाले,  या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्‍तीला आम्ही लवकरच शोधून काढू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

पोलीस आता त्या फोन क्रमांकावरून पुढचा तपास करत आहेत. तो फोन कुणी केला? त्याचा उद्देश काय आहे? सीम कार्ड कुणाच्या नावावर आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून राजकीय नेते आणि पक्षाच्या नावाचा गैर वापर करत फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे का याचाही शोध घेत आहे.

First published:

Tags: Chandrakant patil