पुणे, 04 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. याच काळात रोहा परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेला अत्यावश्यक असणारी औषध मिळत नव्हती. त्यामुळे त्रास होत होता. ही औषधं महिलेपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं मात्र कशी पोहोचवायची हा प्रश्न चाटर्ड अकाऊंटंट असलेल्या मुलानं होता. मुलाच्या विनंतीनंतर या समस्येवर डेक्कन पोलिसांनी तोडगा काढला आहे. पुण्यात राहणाऱ्या चार्टट अकाऊंटंट असलेल्या मुलानं अनिल धारप यांनी डेक्कन पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी कठीण प्रसंगी वेळेवर महिलेपर्यंत मदत पोहोचवली आहे. रोहा इथे राहणाऱ्या आई सुधा धारप यांना पुणे पोलिसांनी मदत करत औषध पोहोचवली आहेत. पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की निरगुडकर यांना तातडीच्या कामासाठी महाड इथे जायचं होतं. त्यांना विनंती करून रोह्याला धारप यांच्या आईची औषध पोहोचवण्याच्या अटीवर जाण्याची परवानगी देण्यात आली. धारप यांनी ही औषध निरगुडकरांकडे पोहोचवली आणि त्यांनी ती रोह्याला पोहोचवली. अनिल धारप यांच्या आईला वेळेत औषध पोहोचल्यानं समस्या दूर झाली आणि त्यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. हे वाचा- पुणेकरांनो सुरक्षित राहा, अवघ्या 24 तासांत सापडले 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ‘डेक्कन पोलिसांच्या मदतीनं आईपर्यंत औषध वेळेत पोहोचली त्यामुळे तिच्या जीवाचा धोका टळला. मी डेक्कन पोलिसांचे खूप खूप आभार मानतो’, असं अनिल धारप यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 490 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी औषध किंवा अत्यावश्यक सेवांचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा ठिकणी अत्यावश्यक सेवा पुरवणारे किंवा पोलीस नागरिकांच्या मदतीला धावून येत असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळात आहे. हे वाचा- राशीभविष्य : कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी घ्यायला हवी आरोग्याची काळजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.