राशीभविष्य : कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी घ्यायला हवी आरोग्याची काळजी

राशीभविष्य : कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी घ्यायला हवी आरोग्याची काळजी

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या 04 एप्रिलचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक दिवस आपला सारखा नसतो येणाऱ्या दिवसात काय घडू शकण्याची शक्यता आहे याचा अंदाज आपल्याला असेल तर समस्यांवर तोडगा काढणं अधिक सोपं होऊन जातं यासाठी जाणून घ्या 4 एप्रिलचं राशीभविष्य.

मेष - पालकांच्या मदतीनं आर्थिक संकटातून मुक्त व्हाल. जोडीदाराचा मूड खराब असेल तर तुम्ही ताण घालवून तो चांगला कराल.

वृषभ- मानसिक ताण दूर करून सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनावर अनावश्यक वेळ घालवू नका.

मिथुन - कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. सकारात्मक वृत्तीमुळे अडथळ्यांचा सामना कराल. पार्टनरला दुखवणार नाही याची काळजी घ्या.

कर्क - आपला वेळ आज छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावायला हवा. आर्थिक परिस्थितीमुळे महत्त्वाची कामं अर्धवट अडकू शकतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

हे वाचा-विदर्भात कोरोनाने घेतला 2 बळी, राज्यात मृतांची संख्या 21 वर

सिंह - आज आर्थिक योजनांमध्य गुंतवणूक करण्याचं धाडस करू नका. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल परंतु धीर धरा.

कन्या - रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आज विशेष काळजी घ्यायला हवी. काही छोट्या कारणांमुळे वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.

तुळ - द्विधा मनस्थितीमुळे आपण गोंधळात पडू शकता. छंदांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा मोकळा वेळ आहे. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण ठेवणे चांगले.

वृश्चिक - नव्या कल्पनांमुळे आपल्याला आर्थिक फायदा होईल. योग्य निर्णय घेतल्यास समस्या उद्भवणार नाहीत.

धनु - लोकांच्या सल्ल्यावर पैसे गुंतवणे हा यशाचा मंत्र आज आहे. आपला दबदबा निर्माण करणारा स्वभाव टीकेचे कारण बनू शकतो.

मकर - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. प्रेमासाठी आजचा दिवस खास आहे. काम करताना आपल्या बॉसचा मूड चांगला नसल्यानं तुम्हाला त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आज ताण येईल.

कुंभ- आशावादी विचारांनी स्वत: ला प्रेरित कराल.आजूबाजूच्या . लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला राग येईल. आज आपल्या प्रियकरापासून दूर राहण्याचे दु: ख तुम्हाला सतत त्रास देत राहील. सहकार्यांकडून अपेक्षित सहकार्य होणार नाही; पण धीर धरा.

मीन- आपला समजूतदारपणा व प्रयत्न येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच यशस्वी करतील. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. प्रिय व्यक्तसोबत वेळ घालवल्यानं कंटाळा दूर होईल.

हे वाचा-कोरोनामुळे युरोपमध्ये 40 हजार लोकांचा मृत्यू, भारतातील आकडा 2547 वर

First published: April 4, 2020, 8:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading