जावयाने नेला पुण्यात कोरोना! लपून गावी गेल्यानंतर सापडले 3 पॉझिटिव्ह, गाव हादरलं

जावयाने नेला पुण्यात कोरोना! लपून गावी गेल्यानंतर सापडले 3 पॉझिटिव्ह, गाव हादरलं

पत्नीला मुंबईमध्ये रुग्णालयात ठेवून जावयी रात्री तिघांना घेऊन गेला पुण्यात आणि...!

  • Share this:

पुणे, 19 मे : घाटकोपर इथून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई इथं परतलेल्या 4 नागरिकांपैकी तिघांचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नागरिकांना गावी सोडणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील साकोरे इथल्या जावयालाही लागण झाली असल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी असं आवाहन वैधकिय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी केलं आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी सांगितलं की, शुक्रवार 15 रोजी मुंबई ( घाटकोपर)इथून दोन लहान नातींना घेऊन आजी आजोबा रात्री आंबेगावमधील साकोरे इथल्या जावयाच्या गाडीत बसून कवठे येमाई गावात आले. त्यांना कवठे येमाई इथं सोडून हा जावई पसार झाला. या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई इथं चालक असून त्याला कोरोनोची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागानं मुंबईतच ताब्यात घेतलं.

राज्य सरकारनं जाहीर केली नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं होणार सुरू पण...

घरात राहणारी मुली व आजी आजोबा रात्रीत जावयाला सोबत घेऊन मुळ गाव असलेल्या कवठे येमाई इथं आले. याबाबतची बातमी समजताच जागृत ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना क्वांरंटाईन केलं. मात्र, नंतर संशय आल्यानं औंध इथं जिल्हा रुग्णालयात रविवारी पाठवण्यात आलं. त्या चौघापैकी आजी आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल पॉढिटिव्ह आला आहे. तसंच जावई सुद्धा पॉझिटिव्ह आला आहेत.

21 वर्षांनंतर पुन्हा भारतावर आलं सुपर चक्रीवादळाचं संकट, कोणाचंही वाचणं आहे कठीण

यामुळे कवठे येमाई परीसरात गावकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावण निर्माण झालं आहे. या घटनेनं शिरूरच्या पश्चिम भागात पहिला रुग्न सापडला आहे. याबाबत तहशिलदार लैला शेख यांनी तत्काळ प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. सध्या मुंबईमधून मोठ्या प्रमाणात लोक गावाला रात्री-बेरात्री कोणतीही परवानगी न घेता गावाला येत असून, ते प्रशासनाला माहीती देत नाहीत. चार दिवसापुर्वी टाकळी हाजीमध्येही 12 लोक मुंबईहून दाखल झाले. त्यांना तत्काळ ग्रामसेवक राजेश खराडे यांनी क्वांटाईन केलं आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो कामगारांची तुफान गर्दी, धक्कादायक VIDEO आला समोर

संपादन - रेणुका धायबर

First published: May 19, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading