21 वर्षांनंतर पुन्हा भारतावर आलं सुपर चक्रीवादळाचं संकट, कोणाचंही वाचणं आहे कठीण

21 वर्षांनंतर पुन्हा भारतावर आलं सुपर चक्रीवादळाचं संकट, कोणाचंही वाचणं आहे कठीण

भारतात अशा प्रकारचं सुपर चक्रीवादळ आलं होतं, ज्यामध्ये सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे : भारतातील पूर्वेकडील राज्ये सध्या 'अ‍म्फान' चक्रीवादळाच्या धोक्याखाली आहेत. हा धोका जास्त आहे कारण, हे एक सुपर चक्रीवादळ आहे. यामध्ये, वाऱ्याचा वेग 200 किमी ताशीपेक्षा वेगवान असू शकतो. यापूर्वी सन 1999 मध्ये भारतात अशा प्रकारचं सुपर चक्रीवादळ आलं होतं, ज्यामध्ये सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारनं ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली. त्याआधीही 3 नोव्हेंबर 1970 रोजी पूर्व पाकिस्तान (सध्या बांगलादेश) आणि पश्चिम बंगालमध्ये भोला नावाचं सुपर चक्रीवादळ आलं होतं, जे आतापर्यंतचं सर्वात भयंकर चक्रीवादळ मानलं जातं. त्यात सुमारे पाच लाख लोक मरण पावले आणि यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 240 किलोमीटर होता.

नेशनल सायक्‍लोन सिस्‍क मिटीगेशन प्रोजेक्‍ट (NCRMP) नुसार 1891 ते 2002 दरम्यान कटक, पुरी आणि बालासोरमध्ये सुमारे 83 वेळा चक्रीवादळ आलं आहे. यात सुपर चक्रीवादळांचादेखील समावेश होता. चक्रीवादळ प्रत्यक्षात कित्येक टप्प्यात विभागलं गेलं आहे, त्या आधारे ते चक्रीवादळ किंवा सुपर चक्रीवादळ ठरवलं जातं. सामान्य चक्रीवादळात वाऱ्याचा वेग 34 ते 47 किलो नॉट्स किंवा 62 ते 88 किमी / ताशी असू शकतो. तर, शक्तिशाली चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 48 ते 63 किलो नॉट्स किंवा 89 ते 118 किमी / ताशी असू शकतो.

वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो कामगारांची तुफान गर्दी, धक्कादायक VIDEO आला समोर

तिसर्‍या प्रकारात अधिक शक्तिशाली चक्रीवादळ वादळ असू शकतं. यामध्ये वाऱ्याचा वेग 64 ते 119 किलो नॉट्स किंवा 119 ते 221 किमी प्रति तासापर्यंत असू शकतो. यानंतर सुपर चक्रीवादळाची चौथी आणि अंतिम श्रेणीसुद्धा आहे. ज्यामध्ये वाऱ्याचा वेग 221 किमी प्रतितासपेक्षा वेगवान असतो.

भारतातील चक्रीवादळांविषयी बोलायचं झालं तर त्याचा इतिहास खूप मोठा आहे. 2009 मध्येही पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात ‘आईला’ नावाचं चक्रीवादळ आलं होतं. यामुळे 300 पेक्षा जास्त लोक मरण पावले आणि 1 दशलक्षाहून अधिक लोक बेघर झाले होते. 2008 मध्ये 'फणी' चक्रीवादळही आलं होतं. ही दोन्ही चक्रीवादळं श्रेणीत नसली तरी यावेळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अधिक धोका निर्माण झाला होता. तज्ज्ञांच्या मते, या दशकात भारताने बरीच प्रगती केली आहे. त्याचबरोबर शासनाच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळेही जीवित व संपत्तीचं नुकसान कमी करण्यात यश आलं. या वेळीही सरकार व एनडीआरएफ जोरदार बंदोबस्ताबाबत पूर्णपणे सतर्क आहेत.

डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या

एनडीआरएफच्या महासंचालकांच्या म्हणण्यानुसार, 17 कंपन्यांना ओडिशाला पाठवण्यात आलं आहे. कोलकाता, एरिया सायक्लोन वॉर्निंग सेंटरचे संचालक डॉ. गणेश कुमार दास यांच्या म्हणण्यानुसार, समुद्रामध्ये जेवढी तीव्रता दिसत आहे तितकी तीव्रता भूमीवर दिसत नाही. त्यामुळे आशा आहे की, जेव्हा ते किनाऱ्यावर हे वादळ आदळेल तेव्हा त्याची तीव्रता कमी होईल. जोपर्यंत अम्फान चक्रीवादळाच्या धोक्याचा प्रश्न आहे तोपर्यंत वाऱ्याच्या वेगात परिणाम दिसून येणार.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 19, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading