जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती

येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती

येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती

College Academic Year: उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 28 जून: उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन (College) शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावर लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. पुण्यात (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयात उदय सामंत यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. हेही वाचा-  सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना दरम्यान कोरोनामुळे प्राध्यापक भरती (Professors Recruitment )थांबली होती. ही भरती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार 74 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती होईल. पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे. तसंच 121 जागांवरती ग्रंथपाल भरती आणि विद्यापीठांमधील 659 जागांवरती अन्य भरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे, उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या घोषणेमुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात