जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / 'जिथे जाईन तिकडे माझ्या मागे याल का?', पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसमोर सूचक विधान

'जिथे जाईन तिकडे माझ्या मागे याल का?', पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसमोर सूचक विधान

पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसमोर सूचक विधान

पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसमोर सूचक विधान

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या होत्या. या प्रचारसभेमध्ये पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांची आठवण सांगत सूचक विधान केलं.

  • -MIN READ Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
  • Last Updated :

चिंचवड, 19 फेब्रुवारी : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या होत्या. या प्रचारसभेमध्ये पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांची आठवण सांगत सूचक विधान केलं. मुंडे साहेब पाठीमागे हात बांधून निघाले की त्यांची माणसं त्यांच्यासोबत निघायची. मी हात बांधून निघाले तर मला त्यांच्यासारखं जमेल का? मी जिकडे जाईन तिथे तुम्ही माझ्यामागे याल का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारला आहे. ‘आता तरी मतदानाला जायचं आहे फक्त. 26 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटण दाबायचं,’ असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी चिंचवडच्या मतदारांना केलं आहे. ‘आज मला बाबांची आठवण आली, त्यांचं काम मोठं होतं. स्त्री म्हणून मला अश्विनी जगताप यांचा अभिमान आहे. लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली म्हणून मी प्रचाराला आले. मला वाघीण म्हणून संबोधतात कारण माझा तसा बाणा आहे. मुंडे साहेबांच्या निधनानंतर मला वाघीण बनावं लागलं,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘राजकारण सोपं नाही, अनेक वर्ष खपल्यानंतरही पद मिळत नाही, पण आपल्या नेत्याकडे बघून कार्यकर्ता काम करत असतो. मी परिवारवादाचं समर्थन करत नाही, पण एखादा परिवार जनसेवा करतो, त्यांच्यापाठीशी आपण उभं राहायला हवं,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं निधन झालं, त्यामुळे चिंचवड आणि कसबा पेठची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकींच्या प्रचारासाठी भाजपने सगळ्या बड्या नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसब्यामध्ये हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात