मराठी बातम्या /बातम्या /पुणे /चिंचवड पोटनिवडणुकीत फडणवीसांची एंट्री, मध्यरात्री पोहोचले जगतापांच्या घरी!

चिंचवड पोटनिवडणुकीत फडणवीसांची एंट्री, मध्यरात्री पोहोचले जगतापांच्या घरी!

 देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्य रात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट दिली

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्य रात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट दिली

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्यरात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट दिली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 16 फेब्रुवारी : 'त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, उगीच आमच्यावर टीका करून खापर फोडू नये, असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध् रात्री अचानक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना भेट दिली , आमदार लक्ष्मण जगताप यांचा बुधवारी पहिला जन्मदिवस होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री जगताप कुटुंबीयांना भेटून, त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराबद्दल चौकशी केली

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे याला निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.

('मला भूकंपाची चाहूल..' रोहित पवारांनी केलं मोठं भाकित; म्हणाले, सत्ताधारी आमदार अस्वस्थ..)

त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, उगीच आमच्यावर टीका करून खापर फोडू नये, असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला.

चिंचवड विधानसभा निवडणुकीत कितीही उमेदवार उभे झाले असले तरी चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमच्याच उमेदवार विजयी होईल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

(आता बॉलीवूडवर शिंदे-फडणवीस सरकार नियंत्रण आणणार; लवकरच SOP होणार लागू)

त्याचबरोबर चिंचवड विधानसभा निवडणुकीत मनसेने दिलेला सशर्त पाठिंब्यावर देखील देवेंद्र फडणवीस बोलले आहेत पाठिंबा पाठिंबा असतो त्यात शर्ती नसतात अस फडणवीस म्हणाले.

First published:
top videos