जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / चंद्रकांत पाटील नवा लेटरबॉम्ब टाकणार, आता कोण अडकणार?

चंद्रकांत पाटील नवा लेटरबॉम्ब टाकणार, आता कोण अडकणार?

चंद्रकांत पाटील नवा लेटरबॉम्ब टाकणार, आता कोण अडकणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पुन्हा एक लेटरबॉम्ब टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 3 जुलै : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे ईडी (ED), सीबीआयचा (CBI) ससेमिरा लागलेला आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र अमित शहा (Amit Shah) यांना लिहिले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील हे आणखी एक लेटरबॉम्ब टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील 54 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार आहे. साखर कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असेल तर यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे, मग भाजपचे नेते असले तरी त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी पत्र लिहू नये हिच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. VIDEO: ठाण्यापाठोपाठ जळगावातही लसीकरण केंद्रावर राडा; धरणगावात तुंबळ हाणामारी मी पत्र लिहून मागणी करणार आहे की, सर्व कारखान्यांची चौकशी करा. या कारखान्यांची किंमत किती होती, लिलाव किती रुपयांना झाला. कारखान्यांवर नंतर कर्ज किती घेतलं गेलं या सर्वांची चौकशी झाली पाहिजे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षावर आरोप कऱण्यात येत आहे की, महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय द्वेषापोटी कारवाई होत आहे यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, आमच्या सरकारच्या काळातील प्रकरणं काढायला कुणी तुम्हाला अडवलं आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे राजकीय नेत्यांचेच आहेत. त्यामुळे जर राज्यातील 54-55 कारखान्यांची चौकशी झाली तर या प्रकरणात कोण अडकणार अशी आता चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात