गणेश दुडम, प्रतिनिधीदेहू, 16 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलंय.
देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक विधान केले आहे.
पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर
चंद्रकांत पाटील यांना संभाजी ब्रिगेडच्या युतीच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, भाजप हा पक्ष कोणा एका व्यक्तीचा नाही. कोणताही निर्णय समूहाने घेतला जातो. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आलाच तर आमची नऊ सदस्यांची कोअर कमिटी यावर चर्चा करेल.
संभाजी ब्रिगेडच्या कोणाशी चर्चा झालेली नाही. असा कोणताही विषय राज्यातील कोणत्याही नेत्याकडे आला तर त्यांनी माझ्याशी शेअर करायला हवा. त्यांचं हे असं म्हणणं आहे, आपण काय करूयात. आमचा ऑल इंडिया नव्हे तर ऑल वर्ल्ड पक्ष आहे. त्यामुळे इतक्या सहज आमचा निर्णय होत नाही, त्याची मोठी प्रक्रिया आहे. हे सगळंच हवेतील आहे आणि जर-तर वर मी उत्तर देत नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.