मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आधी धडक दिली नंतर कारने चिरडून पळाला, अखेर महिन्याभरानंतर पुणे पोलिसांनी पकडला

आधी धडक दिली नंतर कारने चिरडून पळाला, अखेर महिन्याभरानंतर पुणे पोलिसांनी पकडला

 अपघातात जखमी झालेल्या अनिल शहा यांना मदत करायला हवी होती. पण, धडक दिल्यानंतर अवघ्या काही सेंकदात सागरने घटनास्थळावरून पळ काढला होता.

अपघातात जखमी झालेल्या अनिल शहा यांना मदत करायला हवी होती. पण, धडक दिल्यानंतर अवघ्या काही सेंकदात सागरने घटनास्थळावरून पळ काढला होता.

अपघातात जखमी झालेल्या अनिल शहा यांना मदत करायला हवी होती. पण, धडक दिल्यानंतर अवघ्या काही सेंकदात सागरने घटनास्थळावरून पळ काढला होता.

पुणे, 22 ऑक्टोबर : पुण्यातील विश्रांतवाडी इथं भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी धडक देऊन फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी भागात महिन्याभरापूर्वी एक अनिल शहा यांच्या दुचाकीला एका भरधाव कारने धडक दिली होती. अनिल शहा हे एका चौकातून जात होते. त्याच वेळी एका भरधाव हुंदई असेंट कारने अनिल शहा यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अनिल शहा हे हवेत फेकले गेले होते. एवढंच नाहीतर कारच्या धडकेनं खाली कोसळल्यानंतरही कार थांबली नाही. त्याने पायावरून कार तशीच पळवून नेली.

भरचौकात ही घटना घडली होती. चौकात असलेल्या एका घरावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. अखेर महिन्यभराच्या तपासानंतर कारचालकाचा पत्ता मिळाला. सागर चव्हाण असं या कारचालकाचे नाव होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी सागर चव्हाणची गाडीसुद्धा ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भागात फार अशी वर्दळ नव्हती. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या अनिल शहा यांना मदत करायला हवी होती. पण, धडक दिल्यानंतर अवघ्या काही सेंकदात सागरने घटनास्थळावरून पळ काढला होता.

First published: