चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 04 जून : पुण्यात वडकी इथं बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत शौकिनांनी गर्दी केली होती. दरम्यान, एक धक्कादायक दुर्घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याजवाळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले होते. आज सायंकाळी या शर्यतीवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. शर्यत शौकिनांना बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. Pune News : स्पर्धा ऐन रंगात आली अन् ‘त्याने’ घाटात केला राडा; काही मिनिटांत सगळे गायब दरम्यान, आज पुण्यात सांकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शिरूरमधील रामलिंग इथं वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. छत्रती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण दुपारनंतर झालेल्या पावसाने मंडप आणि साउंड सिस्टमचे नुकसान झाले. या वादळाचा फटका आयोजकांसह बैलगाडा मालकांनाही बसला. घटना घडताच मैदानावरील पंचांनी तातडीने कार्यक्रमाच्या जवळच असलेल्या रुग्णवाहिकेला कॉल केला. त्यातून गंभीर जखमींसह इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.