पुणे, 18 जुलै : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून पुण्यातील बोनिसा ज्वेलर्सतर्फे ( Bonisa Jewelers ) माजी सैनिकांसाठी एक सुंदर ‘कमिटमेंट रिंग’ तयार केली आहे. बोनिसा ज्वेलर्सतर्फे माजी सैनिकांसाठी ‘कमिटमेंट रिंग’ ( commitment rings ) ही भेट म्हणून तयार केली आहे. 7500 माजी सैनिकांना ही कमिटमेंट रिंग गिफ्ट म्हणून दिले जाणार आहे. सोने, चांदी, हिरे आणि विविध राज्यांतील मातीपासून बनवलेल्या ‘कमिटमेंट रिंग’ भेट देण्यासाठी बोनिसा ज्वेलर्सतर्फे ‘एक इंडिया मिशन’ सुरू ( One India Mission ) करण्यात आले आहे. बोनिसा ज्वेलर्सचे संकेत बी बियाणी यांनी सांगितले की, “ही एक इंडिया रिंग चांदीची असून यामध्ये सोने आणि हिऱ्यासोबतच भारतातील 29 राज्यातून माती गोळा करून ही रिंग बनवण्यात आली आहे. चांदी म्हणजे शांततेचे प्रतीक मानले जाते सोने म्हणजे भारताचे प्रतीक आहे कारण आपल्या भारताला सोने की चिडिया म्हटले जाते. प्रत्येक राज्यातील माती म्हणजे ही देशातील एकात्मतेचे प्रतीक असून भारतातील प्रत्येक व्यक्ती हा हिरा आहे. यामुळे या रिंग मध्ये हिरा देखील जडवण्यात आलेला आहे”. वाचा :
Pune : दहावी पास विद्यार्थ्यांना मिळेल 3 लाखांचे पॅकेज! लगेच करा ‘या’ कोर्सला अप्लाय माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार पुण्यातील बोनिसा ज्वेलर्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी) येथील 88 माजी सैनिकांना ‘एक इंडिया रिंग’ देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात 26 जानेवारी रोजी करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संकेत बी बियाणी यांनी दिली. सर्वसामान्य नागरिक ही देऊ शकतात कमिटमेंट रिंग भेट कोणीही आपल्या सैनिकांना ही रिंग भेट देऊन या चळवळीचा एक भाग बनू शकेल. यासाठी आमच्या
www.indiaek.com
वेबसाईटवर भेट द्या. या रिंग किंमत 9100 एवढी आहे. जर कुणाला ही रिंग सैनिकांना गिफ्ट करायची असेल तर ती 4960 रुपये एवढी किंमत देऊन गिफ्ट करू शकता. तसेच इतर नागरिकांनी खरेदी केलेल्या रिंगच्या किंमतील 10% रक्कमही आम्ही शहीद सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहोत, असे बी बियाणी यांनी सांगितले.
गुगल मॅप वरून साभार…
संपर्क कसा कराल? जर तुम्हाला सैनिकांना ही रिंग भेट द्यायची असेलतर तुम्ही जलक ज्वेलर्स 286/287, नारायण पेठ, दैनिक प्रभात प्रेसच्या मागे, तेंडुलकर चौक, विजय टॉकीज जवळ, पुणे, 411 030 या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच 7278063333 या मोबाईल नंबरवर संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता.