इंदापूर, 14 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली आहे. टनु गावात एका शेतकऱ्याला ही वस्तू सापडली आहे. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वस्तू ताब्यात घेतली आहे. बॉम्बनाशक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात टनु गावात एका वस्तीवर शेतकऱ्याला बॉम्बसदृश वस्तु सापडली शेतकऱ्याने याचे फोटो काढून काढून पोलिसांना पाठवले. शेतकऱ्याने 112 नंबर ला कॉल करून सदरची माहिती दिली. (Nashik : रेल्वे स्टेशनवर मिळणार शुद्ध हवा, पाहा कसं आहे देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर! Video) पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपतकास याचा “वास” दिला असता त्याने ही वस्तू डिटेक्ट केली आहे. (धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा) रात्र झाल्याने पोलिसांनी सदर वस्तूच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून आज बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकास पाचारण करण्यात आले असून शेतकऱ्याला सापडलेले वस्तू खरंच बॉम्ब सदृश्य आहे का याचा तपास बॉम्ब निकामी करणारे पथक करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.